| मुंबई | प्रतिनिधी |
दिव्यांगांना देण्यात आलेल्या ई-रिक्षाच्या मुद्द्यावरून प्रहार संघटनेचे अध्यक्ष आ. बच्चू कडू यांनी कंपनीच्या कर्मचार्याच्या कानशिलात लगावली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. बच्चू कडू सध्या संभाजीनगरच्या दौर्यावर असून, शुक्रवारी त्यांचा संभाजीनगरमध्ये शेतकरी, बेरोजगारीच्या प्रश्नावर महामोर्चा काढण्यात येणार आहे. दरम्यान, समाज कल्याण विभागाकडून दिव्यांगांना उदरनिर्वाहासाठी वाटप करण्यात आलेल्या ई-रिक्षा पहिल्याच दिवशी बंद पडल्या. काहींना टो करून घरापर्यंत न्यावं लागलं. दिव्यांगाची ही तक्रार ऐकताच बच्चू कडू कमालीचे संतापले आणि त्यांचा पारा चढला. त्यानंतर त्यांनी शेजारीच उभे असलेल्या समाज कल्याण विभागाच्या कर्मचार्याच्या कानशिलात लगावली.