आ. जयंत पाटील यांनी घेतली उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी गुरुवारी राज्याचे उप मुख्यमंत्री भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांच्या समवेत शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील या देखील उपस्थित होत्या.

दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी आ. जयंत पाटील यांनी ही सदिच्छा भेट घेतल्याचे सांगण्यात येते. यावेळी बराच वेळ या दोन नेत्यांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली.

Exit mobile version