पनवेल रेल्वे स्टेशनवर मोबाईलची चोरी

Yellow crime scene do not cross barrier tape in front of defocused background. Horizontal composition with selective focus and copy space.

| पनवेल | वार्ताहार |

पनवेल रेल्वे स्टेशनवर लोकल पकडण्यासाठी प्लॅटफॉर्मवर राहिलेला मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरून नेला आहे. या घटनेविषयी पनवेल रेल्वे पोलिस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पनवेल-ठाणे प्रवासादरम्यान पनवेल रेल्वे स्थानकात लोकल पकडल्यानंतर त्याच्याकडील 1 लाख 62 हजार रुपये किमतीचा आयफोन 14 प्रो प्लॅटफार्मवर विसरून गेला. मोबाईल विसरल्याचे लक्षात येताच तो लोकलमधून उतरून बाकड्याजवळ गेला, परंतु तोपर्यंत मोबाइल चोरीला गेला होता. या घटनेविषयी पनवेल रेल्वे पोलिस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Exit mobile version