सराईत मोबाईल चोरटा पोलिसांच्या ताब्यात

। पनवेल । प्रतिनिधी ।

पनवेल शहर परिसरात मोबाईल चोरी करणार्‍या एका सराईत गुन्हेगाराला पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. गेल्या काही दिवसापासून पनवेल बस स्थानक परिसरात प्रवाशांचे मोबाईल चोरीस जाण्याचे प्रमाण वाढले होते. त्यासंदर्भात वपोनि नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि प्रविण फडतरे, पोहवा संदेश म्हात्रे, तुषार बोरसे, अमोल पाटील, मिथुन भोसले, विशाल दुधे, सचिन कोर, किरण कराड आदींच्या पथकाने गुप्तबातमीदार व तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी कलीम रशीद शेख (31, रा.कोपरखैरणे) या सराईत मोबाईल चोरट्यास ताब्यात घेतले. तसेच, त्याच्याकडून चोरलेले 4 मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत.

Exit mobile version