। पुणे । वृत्तसंस्था ।
पुणे मेट्रोसह पुण्यातील विविध उपक्रमांचे आज उदघाटन होणार असून त्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर गेले आहेत. या दौऱ्यादरम्यान मोदींच्या हस्ते महत्त्वाकांक्षी अशा पुणे मेट्रोच्या गरवारे महाविद्यालयाजवळील मार्गिकेचं उद्घाटन केलं जाणार आहे. मोदींची आज एमआयटी महाविद्यालयाच्या मैदानावर जाहीर प्रचारसभा देखील होणार आहे. तर, या दौऱ्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून शहरभर ठिकठिकाणी आंदोलन करून विरोध दर्शवण्यात आला आहे.