बहिरीचापाडा येथे शेकाप चषक क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
या जिल्ह्यावर आपले राज्य आहे. आज चौथी पिढी सुद्धा ठामपणे राजकारणात उभी राहिली आहे. त्यामुळे शेकापक्षाला घेतल्याशिवाय कोणीही जिल्ह्यावर राज्य करु शकत नाही. त्यामुळे रायगड जिल्हा परिषदेत शेकापक्षाशिवाय पर्याय नाही. अशा शब्दात शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी जोरदार राजकीय फटकेबाजी करत सर्वांची मने जिंकली.
अलिबाग तालुक्यातील बहिरीचापाडा येथे शेतकरी कामगार पक्ष युवा चषक आयोजित नाईट अंडरआर्म बॉक्स सर्कल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन सोहळा शनिवारी पार पडला. प्रकाशझोतात खेळविण्यात येणार्या या स्पर्धेचा शुभारंभ शेकापचे माजी आमदार पंडित पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. या स्पर्धेदरम्यान आ. जयंत पाटील यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. त्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा शेकापचे जिल्हा चिटणीस अॅड आस्वाद पाटील, जि.प. सदस्या भावना पाटील, अलिबाग पंचायत समिती सभापती प्रमोद ठाकूर, तालुका चिटणीस अनिल पाटील, दिनानाथ पाटील गुरुजी, सत्यविजय पाटील, माजी सरपंच डॉ मनोज पाटील, माजी उपसभापती प्रकाश पाटील, अनिल पाटील, जगन म्हात्रे, गावंड गुरुजी, युवा नेते स्वप्निल सत्यविजय पाटील, मारुती पाटील, सुधाकर पाटील, अनंत म्हात्रे, प्रमोद घासे, नंदकुमार पाटील, सिद्धनाथ पाटील, सरपंच प्रमोद ठाकूर, भरत पाटील आदी आदी मान्यवरांसह शेकाप कार्यकर्ते मोठ्या सख्येंने उपस्थित होते. आ. जयंत पाटील पुढे म्हणाले की, शेकापक्षाचा इतिहास नवीन पिढीला समजला पाहिजे. खारेपाटात सर्वात पहिले या तीन गावांना आमच्या आजोबांनी आणून दिले. नारायण नागू पाटील लोकल बोर्डाचे अध्यक्ष असताना चांगले काम केले तर काय मॉडेल होऊ शकते हे त्या काळात दाखवून दिले. शेकापक्षाने खारेपाटात मोठया प्रमाणावर विकास कामे केली. बाहेर काठयाचे काम पंडित पाटील यांनी करुन दाखवले. बहिरीच्या पाडयावर माझे जास्त प्रेम आहे. नविन लोक शिकले पाहिजेत. सहाही गावात अद्यावत इंग्रजी माध्यमाचे हायस्कूल करायचा आपला मानस आहे. सर्वात जास्त शिक्षक अलिबाग तालुक्याने दिले. खारेपाटात, अलिबाग तालुक्यात क्रीडा स्पर्धा पक्षाच्या झेंड्याखाली खेळल्या जातात त्याबद्दल कौतुक वाटते.हीप्रथा आता सुरु केली पाहिजे.
दोन तीन वर्षांनी मुंबईचे टॉवर येथे उभे राहिले की मैदानासाठी जागा मिळणार नाही. बंधारा झाला की खारेपाटात शिरणारे खारेपाणी बंद होईल. आता एजंट भरपूर झाले आहेत. राज्यकर्तेच जमिनी विकण्याचे काम करीत आहेत. ते होऊ देऊ नका. भविष्यात होणार्या विकासात सर्वात पहिला अग्रहक्क आपल्या तीन गावांचा राहिला पाहिजे अशी आपली भुमीका असेल. 4 ते 5 हजार लोकांना डायरेक्ट इनडायरेक्ट रोजगार उपलब्ध होणार असल्याचे सुतोवाच यांनी दिले. गावोगावी शाळा शेकापने उभ्या केल्या. चिखलात आम्ही इथे यायचो आणि आज काही लोकं शेकापने काय केले म्हणून विचारतात.निष्ठा महत्वाची आहे. निष्ठावान कार्यकर्त्यांची किंमत शेकापक्षाला निश्चीतच राहणार आहे. नवी माणसे येतात जातात पण जुनी माणसे ठाम सोबत राहतात. असे ते म्हणाले.सुभाष ठेंबे यांनी सूत्रसंचालन केले