| अलिबाग | प्रतिनिधी |
रायगड लोकसभा निवडणूकीसाठी एकूण 28 उमेदवारी अर्ज दाखल केले. शनिवारी झालेल्या अर्ज छाननीमध्ये मोदी उर्फ मुजफ्फर चौधरी यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला आहे. उमेदवारी अर्ज अपूर्ण भरल्याने ही कार्यवाही करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.
रायगड लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी जोरात सुरु आहे. वेगवेगळ्या राजकीय पक्षातील उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. दि.12 ते 19 या कालावधीत एकुण 28 उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. या अर्जाची छाननी शनिवारी (दि.20) जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. या छाननीध्ये बहूजन समाज पार्टीचे उमेदवार मुजफ्फर चौधरी उर्फ मोदी यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
मोदींचा उमेदवारी अर्ज बाद
