खडबडीत रस्त्याचे अनेक वर्षांनी काँक्रिटीकरण
| नेरळ । वार्ताहर ।
नेरळ ग्रामपंचायतमधील मोहाचीवाडी ते फणसवाडी या रस्त्याचे काँक्रिटकरण करण्यात आले आहे. कर्जत राज्यमार्ग रस्ता ते मोहाची वाडी आणि तेथून पुढे फणसवाडी या रस्त्याची अनेक वर्षे दुरवस्था झाली होती. 2009 मध्ये या रस्त्याचे पंतप्रधान ग्रामसडक योजनेमधून या रस्त्याचे डांबरीकरण झाले होते. त्यानंतर दहा वर्षात शासनाने या रस्त्याच्या कामाकडे पाहिले नव्हते.
त्या रस्त्यासाठी मोहाचीवाडी रहिवाशी संघ अनेक वर्षे पाठपुरावा करीत होते. रहिवाशी संघाचे चव्हाण तसेच दिवंगत आप्पा देशमुख यांनी अनेक वर्षे त्यासाठी शासन दरबारी आवाज उठवला होता. मागील वर्षी या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आमदारांचे हस्ते झाले होते. मात्र भूमिपूजन करून देखील अनेक महिने रस्त्याचे काम सुरू झाले नव्हते, त्यामुळे स्थानिकांनी उपोषणाचा इशारा दिला होता. या रस्त्याच्या कामाला निधी प्राप्त झाल्यानंतर मोहाचीवाडी ते फणसवाडी या कामाचे काँक्रिटकरण करण्यात आले आणि शेवटी नव्याने तयार झालेला रस्ता आ. महेंद्र थोरवे यांनी फित कापून हा रस्ता वाहतुकीस खुला झाला.
याप्रसंगी संतोष भोईर, भाई गायकर, राजेंद्र तेंडुलकर, उषा पारधी, धर्मानंद गायकवाड, गीतांजली देशमुख, उमा खडे, जयश्री मानकामे, अंकुश दाभणे, अंकुश शेळके, गजु वाघेश्वर, प्रभाकर देशमुख, किसन शिंदे, मिना पवार, गायकवाड, भगवान चव्हाण, चिंधु बाबरे, सुरेश भवारे, सुरेश राणे, वर्षा बोराडे, भालचंद्ग गायकवाड, दिनेश गायकवाड, दिपक गायकवाड, प्रविण गायकवाड, प्रतिक चव्हाण, प्रविण ठमके, अमोल चव्हाण, अंकुश पाटील, प्रशांत देशमुख आदी उपस्थित होते.
