महिलेचा पाठलाग करून विनयभंग

। पनवेल । प्रतिनिधी ।

वारंवार मेसेज करून महिलेचा छुपा पाठलाग केल्याप्रकरणी अनस सुफियान मुल्ला याच्याविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने खऱ्या आणि बनावट सोशल मीडिया खात्यांचा वापर करून पीडित महिलेला वारंवार संदेश पाठवले. तसेच तिचा छुपा पाठलाग केला. फिर्यादीच्या मैत्रिणीशी ओळख करून देण्याच्या बहाण्याने आरोपीने संबंधित महिलेबाबत माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला आणि तिला अनेक संदेश पाठवले. या प्रकारामुळे पीडित महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार पनवेल शहर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

Exit mobile version