अल्पवयीन मुलीचे विनयभंग

| पनवेल | प्रतिनिधी |

अल्पवयीन मुलीला व्हिडीओ कॉल करून शरीराचे अश्‍लील भाग दाखवले व शारीरिक सुखाची मागणी केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात तळोजा पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 14 वर्षीय तरुणीच्या इन्स्टा आयडी अकाउंटवर राणी राठोड 2000 या इन्स्टा आयडीवरून मैत्रिणीचा फोटो पाठवला व तिची मैत्रीण असल्याचे भासवून व्हिडीओ कॉल करण्यास भाग पाडले. या व्हिडीओचा स्क्रीनशॉट काढून पीडित तरुणीच्या इतर मित्र-मैत्रिणींचे इंस्टाग्राम अकाउंटवर व्हायरल केला. याप्रकरणी तळोजा पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Exit mobile version