| महाड | प्रतिनिधी |
महाड तालुक्यातील वाळण येथील माध्यमिक शाळेतील विद्यार्थिनीचा विनयभंग याच शाळेतील शिक्षकाने केल्याची घटना घडली असून याबाबत महाड औद्योगिक पोलीस ठाण्यात सदर शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यू इंग्लिश स्कूलमधील इयत्ता 9 वी मध्ये शिकत असलेली एक विद्यार्थीनी शालेय पौष्टिक आहार दिनाचे कार्यक्रमात शाळेत उभी असताना शाळेतील शिक्षक राजन बाबुराव महाडिक वय 57 याने तिचा विनयभंग केला. हा प्रकार मुलीने आपल्या पालकांना सांगितल्यानंतर पिडीत तरुणीने महाड औद्योगिक पोलीस ठाण्यात पालकांना बरोबर घेवून महाड औद्योगिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.