| अलिबाग| विशेष प्रतिनिधी |
आई, मी रेल्वेखाली जीव देऊन आत्महत्या करतेय, अशी सुसाईड नोट लिहून बेपत्ता झालेल्या अलिबागमधील एका 13 वर्षीय मुलीला सुखरुप शोधून पालकांच्या हवाली करण्यात अलिबाग पोलिसांना यश आलेले आहे.
याबाबतचे वृत्त असे, अलिबागनजीक चेंढरे, विद्यानगर परिसरात राहणार्या 13 वर्षाच्या मुलगीने सुसाईड नोट लिहून घर सोडून जात असल्याचे नमूद केले होते.त्या नोटमध्ये तिने आपण रेल्वेखाली जीव देऊन आत्महत्या करणार असल्याचे म्हटले होते. याबाबतची तक्रार तिच्या आईने अलिबाग पोलीस ठाण्यात दाखल होताच पोलिसांनी तत्परता दाखविली महिलेची तक्रार ऐकून फिर्याद घेण्यास वेळ न दवडता ठाणे दैनंदिनीत नोंद करुन घेतली. तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय जाधव यांच्या नेतृत्वाखाली अभिजीत पाटील, ज्योत्स्ना मासे, सुनील फड, प्रगती खिचडे, अनिल पाटील, निहा बुखारी या अधिकारी, कर्मचार्यांची शोध पथके तयार करुन पेण, रोहा, पनवेल रेल्वे स्टेशन येथे संपर्क साधला.
सदर मुलीचे फोटो व माहिती पाठवून फोनद्वारे कल्पना देण्यात आली. तसेच सोशल मीडिया व्हॉट्सअप ग्रुपवर, पोलीस पाटील, ग्राम सुरक्षा रक्षक दल अलिबाग व वरसोली येथील कोळीवाड्यातील पोलीस मित्र यांना सदरची माहिती शेअर करण्यात येऊन आपआपल्या हद्दीत शोध घेण्याबाबत आवाहन करण्यात आले. या शोध पथकाना अलिबाग, वरसोली, किहीम बीच, चोंढी, झिराड, मांडवा परिसरात पाठवून शोध घेण्यात आला. रात्रौ साडेबाराच्या सुमारास दरम्यान पनवेल शहर पोलीस ठाणे येथून पोलीस अंमलदार देवेन म्हात्रे यांनी फोनवरून नमूद वर्णनाची मुलगी पनवेल एसटीस्टॅन्ड येथे मिळून आल्याचे कळविले. तात्काळ सपोनि जाधव, बुखारी व फड यांचे पथक पनवेल शहर पोलीस ठाणे येथे पाठवून गायब झालेल्या मुलीस ताब्यात घेऊन अलिबाग येथे आणले. सहा तासाच्या अथक शोध मोहिमेतून पोलीस अंमलदार देवेन
म्हात्रे यांनी फोनवरून नमूद वर्णनाची मुलगी पनवेल एसटीस्टॅन्ड येथे मिळून आल्याचे कळविले. तात्काळ सपोनि जाधव, बुखारी व फड यांचे पथक पनवेल शहर पोलीस ठाणे येथे पाठवून गायब झालेल्या मुलीस ताब्यात घेऊन अलिबाग येथे आणले. सहा तासाच्या अथक शोध मोहिमेतून सुखरूप तिला तिच्या आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आले.मुलीला सुखरुप पाहून आईचाही जीव भांड्यात पडला.
शनिवारी (दि. 19) सकाळी 10 वाजता बेपत्ता झालेल्या मुलगीला तिच्या आई-वडीलासह व तिच्या शाळेतील वर्ग शिक्षिका यांना पोलीस ठाण्यात बोलावून घेऊन या घटनेच्या अनुषंगाने तिचे व त्यांचे समुपदेशन करण्यात आले. पोलिसांच्या या शोध मोहिमेचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे.
दरम्यान, याबाबत त्या मुलीकडून कोणतीही माहिती प्राप्त झाली नसल्याचे तपास अधिकारी दत्तात्रय पाटील यांनी सांगितले.