। मुंबई । वृत्तसंस्था ।
लता मंगेशकर यांचे रविवारी सकाळी 8 वाजून 12 मिनिटांनी दीर्घ आजाराने निधन झाले. त्या गेले 28 दिवस ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत होत्या. शनिवारी त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्या उपचाराला प्रतिसादही देत नव्हत्या. अखेर सोमवारी सकाळी त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनानंतर केंद्र आणि राज्य सरकारने दुखवटा जाहीर केला आहे. त्यामुळे राज्य सरकारने दुखवटा जाहीर केला आहे. त्या निमित्ताने सोमवारी 7 फेब्रुवारी रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. केंद्र सरकार पाठोपाठ राज्य सरकारनेही राजकीय दुखवटा जाहीर केल्याने दोन दिवस सर्व सरकारी कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.