दोन दिवसांत मान्सून कोकणात दाखल

। मुंबई । वृत्तसंस्था ।
वेळेआधीच केरळमध्ये दाखल झालेला मान्सून पुढच्या दोन दिवसांत कोकणात दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. एरवी 7 जूनला महाराष्ट्रात दाखल होणारा मान्सून यावर्षी तीन-चार दिवस आधीच कोकणात दाखल होण्याची शक्यता आहे. केरळपासून नंतर कर्नाटकपर्यंत पोहोचलेल्या मान्सूनच्या पुढच्या प्रवासासाठी अनुकूल वातावरण असल्याने पुढच्या दोन दिवसांत गोवा आणि दक्षिण कोकणात मान्सून दाखल होऊ शकतो.

Exit mobile version