27 जूनपासून पावसाळी अधिवेशन?

| मुंबई | प्रतिनिधी |

महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्याची शिफारस करण्याचा निर्णय महाराष्ट्र मंत्रिमंडळाने घेतला आहे. राज्यमंत्रिमंडळाची बैठक गुरुवारी (दि. 6) पार पडली. 27 जूनपासून पावसाळी अधिवेशन सुरू करण्याची मंत्रिमंडळाची शिफारस राज्यपालांकडे पाठवण्यात येणार आहे. याआधी हे अधिवेशन 10 जूनला घेण्यात येणार होते. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते, मंत्री सुधीर मुंनगंटीवार यांनी याबाबत माहिती दिली. चारा छावणी व पाणीटंचाईवरदेखील बैठकीत निर्णय झाले आहेत. 10 जूनपासून अधिवेशन सुरू होणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, आता केंद्रीय अर्थसंकल्प मंजूर करण्यासाठी संसदेच्या अधिवेशनानंतर हे अधिवेशन घेण्यात येणार आहे.

Exit mobile version