यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस

जुलै, सप्टेंबरमध्ये भारतात चांगला पाऊस

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

यंदाच्या मॉन्सून हंगामामध्ये प्रशांत महासागरातील ‌‘एल-निनो’ स्थिती निवळून ‌‘ला-निना’ स्थिती तयार होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे यंदा पावसाळ्यात विशेषतः जुलै ते सप्टेंबर या कालावधीमध्ये भारतात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज आशिया-पॅसिफिक इकॉनॉमिक को-ऑपरेशनच्या (अपेक) हवामान केंद्राने वर्तविला आहे. त्यामुळे बळीराजासाठी ही आनंदाची बातमी असून त्यामुळे शेतकरी वर्गाला काही प्रमाणात दिलासा मिळेल असं सांगितलं जात आहे.

‌‘अपेक’च्या हवामान केंद्राने भारतातील मॉन्सूनचा यंदाचा पहिल्या अंदाज वर्तवला आहे. मॉन्सूनच्या हंगामात विशेषतः जुलै ते सप्टेंबर या कालावधीत भारतात सरासरीपेक्षा जास्त पर्जन्यमान होण्याची शक्यता आहे. प्रशांत महासागरातील ‌‘एल-निनो’ स्थितीचे ‌‘ला-निना’ स्थितीत होत असलेल्या सहज संक्रमणाचे संकेत लक्षात घेता हा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

या अंदाजानुसार पूर्व आफ्रिका, अरबी समुद्र, भारत, बंगालचा उपसागर, इंडोनेशिया, कॅरिबियन समुद्र, उष्णकटिबंधीय उत्तर अटलांटिक, दक्षिण ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण पॅसिफिक या प्रदेशांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता अधिक आहे. पूर्व आशिया आणि उत्तर ऑस्ट्रेलियाच्या काही प्रदेशांमध्ये सरासरीच्या तुलनेत अधिक पर्जन्यमान अपेक्षित असल्याचे ‌‘अपेक’च्या हवामान केंद्राने म्हटले आहे.

या हवामान केंद्राने 15 मार्च रोजी एन्सो (एल निनो-सदर्न ऑसिलेशन) इशारा प्रणाली सुरू केली आहे. यानुसार एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीसाठी ‌‘ला-निना’ स्थितीचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यामुळे धोरणकर्ते आणि भागधारकांना पुढील काही महिन्यांत ला-निना स्थितीशी संबंधित हवामानाचे आकृतिबंध आणि संभाव्य पर्यावरणीय परिणाम यांचे निरीक्षण करणे शक्य होणार आहे.

अल-निनो ते ला-निना!
दरम्यान, अपेकन15ं मार्च 2024 रोजी ईएनएसओ अर्थात अल निनो साऊदन्र ऑसायलेशन ही यंत्रणा वापरात आणली असून, त्यानुसार एप्रिल ते सप्टेंबर 2024 या काळात ला निनाचा मान्सूनवर प्रभाव दिसून येईल. मार्च ते मे 2024 दरम्यान देशात अल- निनोचा प्रभाव दिसून येईल. त्यानंतर मात्र जून ते सप्टेंबर या काळात ला-निनाच्या स्थितीमुळे पावसाच्या प्रमाणावर सकारात्मक परिणाम होताना दिसू शकेल, अस अंदाजही अपेकनं वर्तवला आहे.
Exit mobile version