पोलादपूर तालुक्यातील हा वर्षा पर्यटनासाठी सर्वात लोकप्रिय धबधबा असून मोराच्या पिसाऱ्यासारखा आकार असल्याने मोरझोत असे नाव प्रचलित झाले आहे. पोलादपूर तालुक्यातील कापडे बुद्रुक पासुन नरवीर तानाजी मालुसरे यांच्या उमरठ गावापर्यंत गेल्यावर नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याजवळून चांदले ते खोपड रस्त्यादरम्यान हा धबधबा आहे. कापडे बुद्रुक पासुन गोपाळवाडी येथून घागरकोंडचा झुलता पूल व जलप्रपात पाहून पुढे नरवीर तानाजी मालुसरे यांची समाधी पाहून हा मोरझोत धबधबा वर्षा पर्यटनासाठी आनंदाची पर्वणी ठरत आहे.