अपघात ब्रेकिंग; टेम्पोच्या धडकेत मायलेकीचा जागीच मृत्यू

। पनवेल । वार्ताहर ।
आयशर टेम्पोने दुचाकीला धडक दिल्याने या धडकेत २४ वर्षीय आई व दोन वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील रोहिंजण येथे राहणारे सिराज खान व त्याची पत्नी व मुलगी अदिबा असे स्कूटीने पनवेल-मुंब्रा रोडने प्रवास करत होते. या वेळी त्यांच्या पाठीमागून आलेल्या आयशर टेम्पोने त्यांच्या स्कूटीला जोराची धडक दिल्याने रेहाना खान व अदिबा यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेचा पुढील तपास पनवेल पोलिसांमार्फत केला जात आहे.

Exit mobile version