| पनवेल | वार्ताहर |
पनवेल तालुक्यातील वावंजे येथील सोना चांदी कंपनीच्या गेटवर एका टेम्पोने सायकलवरून जाणाऱ्या 19 वर्षीय तरुणास धडक दिली. या धडकेत आकाश पाटील त्याचा मृत्यू झाला. पनवेल तालुका पोलीस ठाण्यात टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी लहू गोंधळी हा दारूच्या नशेत टेम्पो चालवत होता. ढोंगऱ्याचा पाडा या गावातील कार्यक्रम पाहून सायकलवरून घरी जाणाऱ्या आकाश पाटील याच्या सायकलला त्याची धडक बसली. यात आकाश पाटीलचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी पनवेल तालुका पोलिसांनी लहूविरोधात गुन्हा दाखल केला आहे.