| पनवेल | वार्ताहर |
कामोठे गाव सेक्टर 14 येथे राहणारी जमुनाबाई गुरुनाथ राठोड (35) ही महिला आपल्या तुषार गुरुनाथ राठोड (8) या मुलासह घरातून कोणास काही एक न सांगता निघून गेली आहे. ती अद्याप परत न आल्याने ती हरवल्याची तक्रार तिचे पती गुरुनाथ रामचंद्र राठोड यांनी कामोठे पोलीस ठाण्यात दिली आहे. सदर महिला कुणाला कोठे आढळल्यास त्यांनी कामोठे पोलिस ठाणे फोन नं. 8655354114 येथे किंवा पो. हवालदार माने यांच्याशी 9870226205 येथे संपर्क साधावा.