| गुहागर | प्रतिनिधी |
महात्मा फुले यांनी 3 जुलै 1852 रोजी बहुजनांसाठी पुण्यात शाळा स्थापन करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला. त्यांच्यामुळे आज सर्वसामान्यांना शिक्षणाची दारे खुली झाली व प्रगतीची संधी मिळाली, असे प्रतिपादन मुख्याध्यापक डॉ. मनोज पाटील यांनी केले. वेलदूर-नवनगर येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळेमध्ये ऐतिहासिक दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात धन्वंतरी मोरे, अफसाना मुल्ला, सुषमा गायकवाड, अंजली मुद्दमवार यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांनी महात्मा फुले यांच्या जीवन चरित्र विषयी माहिती दिली. आभार प्रदर्शन अफसाना मुल्ला यांनी केले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी जानवी हरचकर, शिक्षक वृंद अंजली मुद्दमवार, धन्वंतरी मोरे, सुषमा गायकवाड, अफसाना मुल्ला, विद्यार्थी प्रतिनिधी अनिश पालशेतकर, आरोही रोहीलकर तसेच बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.