| पनवेल | वार्ताहर |
ट्रेलरच्या धडकेने एका मोटार सायकलस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पनवेल जवळील जुना मुंबई-पुणे हायवेववर एस.व्ही.मोटार्स पळस्पे समोरील रस्त्यावर घडली आहे. मोटार सायकलस्वार राहूल ढेपे (38) रा.वडाळा हा त्याची मोटार सायकल घेऊन आपल्या गावी माणगाव या ठिकाणी जात असताना पनवेल जवळील जुना मुंबई-पुणे हायवेववर एस.व्ही.मोटार्स पळस्पे येथे त्याच्या गाडीला ट्रेलरची धडक बसल्याने झालेल्या अपघातात तो गंभीररित्या जखमी होऊन मयत झाला आहे. या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.