साळाव नाका येथे मोटारसायकलला अपघात; एक ठार, एक गंभीर जखमी

| रेवदंडा | प्रतिनिधी |
साळाव नाका येथे भरधाव मोटर सायकलचे नियत्रंण सुटल्याने अपघात घडून त्यामध्ये एक ठार व एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. चेहेर गावाकडे मोटर सायकलने दुपारी पावणेचारच्या सुमारास मदनकुमार कन्हाई रजक, रा. साळाव बिर्ला मंदिर नजीक चाळ हे जयेंद्र मधूकर माळी रा. चेहेर, मुरूड यांना डबलसीट घेऊन जात होते. साळाव नाका येथील वळणावर मोटारसायकलचा ताबा सुटून ती रस्त्याचे बाजूच्या कठडयाला धडकली. अपघातात चालक मदनकुमार कन्हाई व येंद्र माळी कठडयाच्या बाजूला असलेल्या हलडे यांचे घराचे मागील छतावर जाऊन आढळले.यामध्ये चालक मदनकुमार कन्हाई यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मयत झाले व जयेंद्र माळी गंभीर जखमी झाले. या अपघातात मोटरसायकलचे मोठे नुकसान झाले तर जखमीस ताबडतोब रूग्णालयाकडे नेण्यात आले.

Exit mobile version