मोटार सायकलची चोरी

। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात उभी करून ठेवलेली होंडा कंपनीची अ‍ॅटीव्हा मोटार सायकल अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना घडली आहे. वैभव म्हात्रे (41) यांनी त्यांची होंडा कंपनीची अ‍ॅक्टीव्हा मोटार सायकल क्र.एमएच-06-एव्ही-1462 ही पनवेल रेल्वे स्टेशन परिसरातील मोकळ्या जागेत उभी करून ठेवली असता जिची किंमत 10 हजार रुपये इतकी आहे अज्ञात चोरट्यांनी सदर गाडी चोरुन नेल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Exit mobile version