वाहतूक पोलीस शाखेतर्फे वाहनचालकांचा सन्मान

| माणगाव | प्रतिनिधी |
देशातील दळण-वळण क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे वाहन चालक. वाहन चालकांचे देशाच्या परिवहन आणि दळणवळण क्षेत्रात अनन्यसाधारण अशी भूमिका आहे. तसेच चालकांचे देशाच्या विकासामध्ये आणि जडणघडणीत महत्त्वपूर्ण योगदान आहे. याबाबत चालक या घटकाचा गुणगौरव करण्याच्या दृष्टीने दरवर्षी 17 सप्टेंबर हा दिवस चालक दिन म्हणून घोषित करण्यात आला आहे.

या दिनाचे औचित्य साधून रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे व जिल्हा वाहतूक शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली माणगाव वाहतूक पोलीस शाखेतर्फे वाहनचालकांचा चालक दिनानिमित्त गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. तसेच या वाहन चालकांना वाहतुकीच्या नियमांबद्दल मागदर्शन करण्यात आले. यावेळी माणगाव वाहतूक शाखेचे वाहतूक पोलीस देवकुळे, लालासाहेब वाघमोडे, बांडे, शेरकर आादी उपस्थित होते.

Exit mobile version