महाड तालुका तलाठी संघाचे आंदोलन

। महाड । प्रतिनिधी ।
महाराष्ट्र राज्य तलाठी संघ व रायगड जिल्हा संघाच्या आदेशान्वये महाड तालुका तलाठी संघाच्यावतीने सोमवारी तहसील कार्यालयासमोर उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी केलेल्या असंविधानिक विधाना विरोधात निदर्शने करण्यात आली .
या संदर्भात संघटनेच्यावतीने देण्यात आलेल्या माहितीमध्ये स्पष्ट करण्यात आले कि, ई-फेरफार, ई-चावडी व पीक पाहणी प्रकल्पाचे राज्य समन्वयक तथा उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी संघटना पदाधिकारी यांच्याबद्दल केलेल्या असंविधानिक विधानाबद्दल व त्यांचे राज्य समन्वयक पदावरून बदली करण्यात यावी याकरिता महाराष्ट्राच्या तलाठी संघाने आंदोलन सुरू केले आहे. या संदर्भात संघटनेचे निवेदन महाड तहसीलदारांकडे सादर केल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष सी.एस.जे.सोनवणे यांनी दिली आहे.

Exit mobile version