खासदार सुनील तटकरे यांचा वाढदिवस सोहळा रद्द

नेरळ | वार्ताहर |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस असलेले रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांचा 10 जुलै रोजी वाढदिवस आहे. दरवर्षी सुनील तटकरे यांचा वाढदिवस त्यांच्या सुतारवाडी येथील निवासस्थानी आयोजित सोहळ्याच्या माध्यमातून साजरा होतो. हजारोंच्या संख्येने रायगड आणि रत्नागिरी तसेच मुंबईमधून कार्यकर्ते आणि समर्थक सुनील तटकरे यांनी शुभेच्छा देण्यासाठी एकत्र येत असतात.2020 मध्ये कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन आणि आपले जिवाभावाचे अनेक कार्यकर्ते, मित्र परिवार यांचे जीवन कोरोनामुळे संपुष्टात आले असल्याने सुनील तटकरे यांनी 2020 मध्ये आपला वाढदिवस साजरा केला नव्हता. यावर्षी 2021 मध्ये देखील हीच स्थिती राज्यात आणि देशात आहे. 2020 च्या आणि आजच्या परिस्थिती फार काही फरक पडला नाही आणि त्यामुळे यावर्षी देखील वाढदिवसाचा सोहळा साजरा होणार नाही. त्याबाबत अधिकृत घोषणा रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हा अध्यक्ष सुरेश लाड यांच्याकडून करण्यात आली आहे. माजी आमदार आणि जिल्हा अध्यक्ष सुरेश लाड यांनी याबाबत प्रसिध्दी पत्रक काढून जाहीर केले आहे. 10 जुलै रोजी कोणत्याही कार्यकर्त्याने किंवा हितचिंतक यांनी खासदार आणि माजी मंत्री सुनील तटकरे यांनी भेटायला जाऊ नये असे जाहीर करण्यात आले आहे

Exit mobile version