| गोवे-कोलाड | वार्ताहर |
खा. सुनील तटकरे यांनी वाशी येथील कलिंगड उत्पादक अनंत मगर यांच्या महादेववाडी येथील शेतावर जाऊन संवाद साधला. यावेळी रब्बी हंगामातील कलिंगड, भाजीपाला, वाल या शेती उत्पादनावर चर्चा करीत जिल्ह्यातील शेतकर्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे सांगितले. बीज उत्पादन, काढणी पश्चात व्यवस्थापन, बाजारपेठ,उ त्पादित मालवाहतूक या संबंधित सविस्तर चर्चा केली.
यावेळी सुरेश मगर, विनोद पाशिलकर, अनंत मगर, नथुराम मगर, माजी सरपंच ज्ञानेश्वर साळुंखे, हरिचंद्र मोरे, रमेश मोरे, उपसरपंच अरविंद मगर, अनंत जंगम, लक्ष्मण भोकटे, गुणाजी पोटफोडे, परशुराम भगत, महेश बामुगडे, रुपेश बामुगडे, महादेव लोखंडे, सतीश भगत, संजय भगत, प्रकाश भगत, चंद्रकांत भगत, मुकेश भोकटे, संदीप मगर आदी उपस्थित होते.
यावेळी सुरेश मगर यांनी शेतकर्यांचे विविध समस्या खा. सुनील तटकरे यांना सांगितल्या. तर शेतकरी अनंत मगर व नथुराम मगर यांनी बीज उत्पादन, देखभाल खर्च व विक्री याची माहिती देत असताना काढणी पश्चात साठवणूक यासाठी तालुक्यातील शेतकर्यांना करण्याची विनंती केली.