कौवडाळ तळे रहिवाश्यांचे खासदारांनो साकडे

। पेण । वार्ताहार ।
2014 ला कौवडाळतळे परिसरात राहणार्‍या 48 कुटुंबियांना तत्काळीन नगरपालिकेच्या सत्ताधार्‍यांनी विकासाचा नावाने रातोरात बेघर केले. तेव्हा पासून कौवडाळतळे परिसरात राहणारे रहिवाशी भाडयाच्या खोल्यांमध्ये राहत आहेत. त्यावेळी सांगण्यात आले होते की येथील रहिवाश्याचे पुनर्वसन केले जाईल. गेली सात वर्ष हे रहिवाशी बेघर आहेत. ज्या 48 कुटुंबियांना बेघर करुन सुशोभित केलेल्या कौवडळतळयाच्या बाजूने आता सत्ताधार्‍यांच्या मर्जीतील मंडळींच्या टपर्‍याचे साम्रज्य आहे. एकीकडे विकासाच्या नावाने 48 कुटुंबियांना बेघर करण्याचे पाप तत्काळीन सत्ताधार्‍यांनी केले. याच रहिवाश्यांनी राष्ट्रवादीच्या पेण येथील मेळयाव्याच्या वेळी खा. सुनिल तटकरे यांना साकडे घातले आहे की, शासनाच्या मदतीने बेघर झालेल्या रहिवाश्यांचे पुनर्वसन करुन दयावे आता महत्वाचा मुद्दा आहे की खासदार सुनिल तटकरे यांची राजकीय ताकद पाहता कौवडळतळे रहिवाश्यांचे पुनर्वसन होणे ही बाब सहज शक्य होउ शकते. परंतु त्याला काही कायदेशीर अडथळा नसावा कौवडाळतळे येथील रहिवाश्यांनी दिलेल्या निवेदना सोबत नगरपालिकेचे ठराव देखील जोडले आहेत. त्यामुळे नजीकच्या काळात खासदार सुनिल तटकरे कशा प्रकारे कौवडाळतळे रहिवाश्यांचा पुनर्वसनाचा प्रश्‍न सोडवतात याकडे सर्वाचे लक्ष्य लागून राहिले आहे.

Exit mobile version