। सिंधुदुर्ग । वृत्तसंस्था ।
महावितरणकडून वीज बिल थकीतबाकी वसुली करिता वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न सुरू असतानाच, आता महावितरण फॉल्टी मीटर व ज्या मीटरची रिडींग घेता येत नाहीत किंवा रीडिंग घेणे शक्य नाही अशा आरएनए, आरएनटी मीटर वर लक्ष केंद्रित करत आहेत . याकरिता महावितरणकडून क्रॉस चेकिंग सुरू करण्यात आले आहे.
कणकवली विभागात क्रॉस चेकिंग मोहीम सुरू करण्यात आली असून, या विभागातील फॉल्टी मीटर बदलण्याची कार्यवाही देखील युद्धपातळीवर महावितरणकडून हाती घेण्यात आली आहे.