ग्राहक घसरून पडण्याच्या घटना
| पनवेल | वार्ताहर |
पनवेल ग्रामीण शहरातील उरण नाका परिसरात असलेल्या मच्छी मार्केटमध्ये रविवारी (दि.15) ग्राहकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. पावसामुळे मार्केटमधील लादी चिखलमय झाल्याने खरेदी साठी आलेले ग्राहक घसरून पडण्याच्या घटना घडल्या असून, गर्दीमुळे अनेकांनी मार्केटमध्ये जाणेच टाळल्याने विक्रेत्यांची मोठी पंचायत झाली आहे.
2015 साली नगरपरिषदेच्या माध्यमातून उरण नाका परिसरात मच्छी विक्रेत्यासाठी मार्केटची इमारत बांधन्यात आली आहे. या ठिकाणी विक्रेत्यासाठी 256 ओटे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. कालांतराने विक्रेत्यांच्या संख्येत वाढ झाल्याने अनेक विक्रेते मार्केटच्या बाहेर उपलब्ध असलेल्या मोकळ्या जागेत मच्छी विक्रीचा व्यवसाय करत होत्या त्याच सोबत मार्केट बाहेरील रस्त्यावर देखील मच्छी विक्री केली जात असल्याने वाहतुकीला अडथळा होऊन मोठी वाहतूक कोंडी होत असल्याची दखल घेत पालिका प्रशासनाच्या अतिक्रमण विभागाकडून मार्केट बाहेर बसणाऱ्या मच्छी विक्रेत्यांवर कारवाई करण्यास सुरवात करण्यात आली आहे. प्रशासनाच्या कारवाईचा धसका घेत अनेक विक्रेत्यांनी मार्केटच्या इमारतीत उपलब्ध इमारती मधील ओट्यावर बसून विक्री करायला सुरवात केली आहे. मात्र, सद्य स्थितीत उपलब्ध असलेल्या ओट्याच्या संखे पेक्षा विक्रेत्यांची संख्या अधिक असल्याने मार्केट साठी उपलब्ध असलेली इमारत ग्राहक आणि विक्रेत्यांसाठी अपुरी पडत आहे. यामुळे मार्केटमध्ये ग्रहकांची मोठी गर्दी होऊन ग्राहक आणि विक्रेत्यांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.
मार्केटची क्षमता वाढवण्याची गरज
2015 साली मच्छी मार्केटसाठी बांधण्यात आलेल्या या इमारती मध्ये 256 विक्रेत्यांसाठी ओटे उपलब्ध आहेत. मात्र, वाढलेल्या लोकसंख्ये सोबतच विक्रेत्यांची संख्या देखील वाढल्याने मच्छी मार्केट साठी नव्या इमारतीची गरज निर्माण झाली आहे.
पालिकेची कारवाई योग्यच पण
रस्त्यावर बसून मच्छी विक्री करणाऱ्या आणि वाहनचालकांचा रस्ता अडवणाऱ्या विक्रेत्यांवर करण्यात येणारी कारवाई योग्यच आहे. पण त्याच सोबत प्रशासनान विक्रेत्यांना पुरेसी जागा उपलब्ध करून दिल्यास ही समस्या कायमची दूर होण्याची शक्यता मैथली भोईर या ग्राहकांनी व्यक्त केली आहे.
आरोग्याचा प्रश्न
सध्या कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होताना दिसत आहे. अशा वेळी मच्छी मार्केट मध्ये होत असलेल्या गर्दी मुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे.