मुंबईच्या फलंदाजांची आतषबाजी

। अहमदाबाद । वृत्तसंस्था ।

विजय हजारे चषक स्पर्धेला सुरूवात झाली असून कर्नाटक संघाविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात मुंबईने मोठी धावसंख्या उभी केली. आयुष म्हात्रे, हार्दिक तामोरे यांच्या फटकेबाजीनंतर श्रेयस व शिवम दुबे यांनीदेखील आतषबाजी केली.

प्रथम फलंदाजीला आलेल्या मुंबईला चौथ्या षटकात विद्याधर पाटीलने धक्का दिला. सलामीवीर अंगकृष रघुवंशी (6) याला त्याने बाद केले. परंतु, त्यानंतर आयुष व हार्दिक या दोघांनी दुसर्‍या विकेटसाठी 141 धावांची भागीदारी करताना मुंबईचा पाया मजबूत केला. यानंतर आयुष 78 धावांवर माघारी परतला. श्रेयस गोपाळने मुंबईला धक्का देताना हार्दिकला बाद केले. मुंबईच्या यष्टिरक्षक-फलंदाजाने मदतीने 84 धावांची खेळी केली. सूर्यकुमार यादव 20 धावा करून पायचीत झाला. यानंतर श्रेयसने 114 धावांची नाबाद खेळी केली. तर, दुबे 63 धावांवर नाबाद राहिला. मुंबईने 50 षटकांत 4 बाद 382 धावांचा डोंगर उभा केला.

Exit mobile version