। खोपोली । प्रतिनिधी ।
मुबंई-पुणे एक्सप्रेस वेवर शनिवारी (दि.26) एक्सप्रेस वेवर अमृताजण ब्रिज जवळ ऑइलचा टँकर पलटी झाल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे शनिवारी सकाळ पासूनच पुणे लेन वर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
बोरघाटातील अमृताजण ब्रिज ते आडोशी बोगद्यातपर्यंत वाहनांच्या चार ते पाच किमी पर्यंत मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या होत्या, त्यामुळे काही वाहने अंडा पॉईंट येथून नो एन्ट्री मार्गे खंडाळ्याकडे जात असल्याने त्याही रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. याचा फटका वाहन चालक आणि पर्यटकांना बसला.