| मुंबई | प्रतिनिधी |
आयपीएलमधील मुंबईच्या विजयाने अनेक संघांचे समीकरण पुन्हा एकदा बिघडले आहे. यामुळे प्ले ऑफची रंगत वाढली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सचा संघ या विजयासह गुणतालिकेत 10 गुणांसह सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. मुंबई इंडियन्स यंदाच्या प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी प्रबळ दावेदारांपैकी एक आहे. त्याच वेळी या शर्यतीत सर्व 10 संघ अजूनही अबाधित आहेत.
पंजाब किंग्जविरुद्ध मुंबई इंडियन्सच्या विजयाने पाच संघांची धाकधूक वाढली आहे. त्या संघांमध्ये लखनऊ सुपर जायंट्स, चेन्नई सुपर किंग्स, राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि पंजाब किंग्ज यांचा समावेश आहे. हे सर्व संघ जवळपास सारख्याच स्थितीत आहेत. लखनौ आणि चेन्नई यांच्यातील सामना रद्द झाल्यामुळे आणखीनच रंजक वाढली आहे. आता परिस्थिती अशी आहे की यापैकी कोणताही संघ कधीही टॉप 4 मधून बाहेर पडू शकतो. अशा स्थितीत पाहिल्यास मुंबईच्या एका विजयाने अन् एकादा संघ टॉप 4 मधून बाहेर. गुजरात टायटन्सचा संघ सध्या गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे.