कचरा टाकणाऱ्यांवर महापालिकेची कारवाई

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

| पनवेल ग्रामीण | वार्ताहर |

पालिकेच्या स्वच्छता निरीक्षकांनी केएलई कॉलेज परिसरात सातत्याने कचरा टाकणाऱ्या कळंबोलीतील रहिवासी लक्ष्मीनारायण यादव यांच्यावर कडक कारवाई केली आहे. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करून यादव यांनी कचरा टाकणे सुरूच ठेवले होते. अखेर त्यांच्यावर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी पनवेल महानगरपालिकेच्यावतीने कळंबोली पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली असून, नियमानुसार यादव यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ भारत अभियान महापालिका कार्यक्षेत्रात राबविले जात आहे. स्वच्छ भारत अभियानाच्या उद्दिष्टांनुसार शहरात स्वच्छता राखण्यासाठी पालिकेचे सफाई कर्मचारी सातत्याने सफाई करत असतात. या पार्श्वभूमीवर ही कारवाई अत्यंत महत्त्वाची आहे.

Exit mobile version