अनधिकृत मच्छिमार्केटवर पालिकेची कारवाई

| पनवेल | वार्ताहर |

पनवेल पालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक क मधील अनधिकृत ठरवण्यात आलेल्या मच्छी मार्केटवर पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून गुरुवारी ( दि. 8) कारवाई करण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक क मधील कामोठे वसाहतीतील सेक्टर 12 येथील मोकळ्या भूखंडावर हे मार्केट भरवण्यात येत होते. या कारवाई वेळी प्रभाग अधिकारी सदाशिव कवठे, कनिष्ठ अभियंता धनराज रजपूत, स्वछता निरीक्षक योगेश कस्तुरे, ऋषिकेश गायकवाड, अतुल वास्कर, अतिक्रमण पथक प्रमुख संतोष म्हात्रे, अतिक्रमण कर्मचारी, सफाई कर्मचारी आदी उपस्थित होते.

Exit mobile version