अल्पवयीन मुलाचा धारदार शस्त्राने खून

| पुणे | वृत्तसंस्था |

पुण्यातील बारामतीत एका अल्पवयीन मुलाचा धारदार शस्त्राने डोक्यात आणि मानेवर वार करत खून केल्याची घटना घडली आहे. बारामती शहरातील जळोची येथील काळ्या ओढाजवळ गुरुवारी दि.22 रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली. गणेश वाघमोडे (17) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. या घटनेने बारामतीत खळबळ उडाली आहे. याबाबत नवनाथ उत्तम चोरमले (39), रा.अहिल्यादेवी चौक जळोची, बारामती) यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Exit mobile version