| नाशिक | वृत्तसंस्था |
नाशिक शहरात पंचवीस वर्षीय युवकाचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना घडली आहे. पंचवटीतील मेरी परिसरात ही घटना घडली आहे. गगन कोकाटे असे या खून झालेल्या युवकाचे नाव आहे. मात्र, हा खून नेमका कोणी आणि कुठल्या कारणावरून केला हे अद्याप कळू शकलेले नाही.
नाशिक शहरात मंगळवारी (दि. 20) मध्यरात्रीच्या सुमारास एका पंचवीस वर्षीय युवकाची काही आज्ञातांनी धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना घडली आहे. गगन कोकाटे असे युवकाचे नाव आहे. प्राथमिक माहितीनुसार हा खून पूर्ववैमनस्यातून झाल्याची माहिती पुढे आली आहे. घटनेची माहिती मिळताच नाशिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कायदेशीर कारवाई पोलिसांनी सुरू केली आहे. तर पोलिसांचं एक पथक तात्काळ संशयिताच्या मागावर पाठवले असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. यातील मारेकऱ्यांना जेरबंद करणे पोलिसांच्या पुढे आता आव्हान आहे.