गणेशभक्तांसाठी मुरूड आगार सज्ज

रोज 32 फेर्‍या; मुंबईतून 12 जादा बसेस
। मुरूड-जंजिरा । वार्ताहर ।
गणेशोत्सव नजीक येऊन ठेपल्याने मुंबईतील चाकरमानी गणेशभक्तांना गावाकडची ओढ लागली आहे. मुरूड तालुक्यात येण्यासाठी एसटी बसचे आरक्षण सुरू आहे. गणेशभक्तांच्या सेवेसाठी मुरूड-जंजिरा बस आगार सज्ज झाल्याची माहीती आगार व्यवस्थापक सनील वाकचौरे यांनी दिली. मुरूड बस आगरातून दररोज 32 शेड्युलस असून सर्व क्षमतेने सुरू असल्याची माहिती सनील वाकचौरे यांनी दिली. मुंबईतून मुरूडकडे येण्यासाठी 12 जादा बसेस मुंबईतील विविध आगरातून सोडण्यात येणार असून त्या संदर्भात चाकरमानी बांधवांनी मुंबईतील आगारात त्वरित संपर्क करून माहिती घ्यावी असे आवाहन करण्यात केले आहे. तसेच नेहमीचा प्रवासीवर्ग आणि गणेशभक्तांसाठी आमचे नियोजन व तत्पर प्रयत्न राहिल असा विश्‍वास सनील वाकचौरे यांनी व्यक्त केला.

Exit mobile version