मुरुड पोलीसांचे संचलन

| आगरदांडा | प्रतिनिधी |

मुरुड पोलिस स्टेशन वतीने शनिवारी (दि.13) आगामी लोकसभा निवडणूक व येणारे सणाच्या पाशर्वभूवर मुरूड मध्ये परेश नाका येथे दंगा काबू योजना राबविण्यात आली. तसेच येणाऱ्या निवडणुका निर्भय व शांततेत पार पाडावी याकरिता रूट मार्च घेण्यात आला. सदर रूट मार्च एकदरा गाव येथून सुरू होऊन बाजारपेठ मार्गे, पेठ मोहल्ला लक्ष्मी खार येथून दत्तवाडी येथे समाप्त झाला. रूट मार्च मा. उपविभागीय पोलिस अधिकारी अलिबाग श्री. विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शाखाली पोलिस निरीक्षक निशा जाधव यांच्या नेतृत्वात पोलिस ठाणे कडील अविनाश राठोड, अविनाश पाटील आदी 3 अधिकारी व 20 अंमलदार तसेच आरसीपी वडखळ कडील 32 अंमलदार मिळून एकूण 55 जणांनी सहभाग घेतला.

Exit mobile version