| मुरूड । वार्ताहर ।
सलग तीन दिवस सुट्ट्यांमुळे मुरुड गजबजले आहे. समुद्रकिनार्यावर हळूहळू पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. मुंबई, पुणे, ठाणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, नाशिक आदी ठिकाणाहून पर्यटक येऊ लागले आहेत. दोन महिने बीचवरील स्टॉलधारकांनी व्यवसाय बंद ठेवले होते. सुट्ट्यांमुळे स्टॉलधारकांनी पुन्हा आपापले व्यवसाय सुरू केले आहेत. हॉटेल व लॉजिंगला पर्यटकांच्या गाड्यांची गर्दी होत आहे.







