| सुधागड पाली । वार्ताहर ।
सलग आलेल्या चार दिवसांच्या सुट्ट्यांमुळे अष्टविनायक तीर्थक्षेत्र बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी रविवारी (ता.14) हजारो भाविक पालीत आले होते. सकाळपासून दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. मंदिर परिसराला जणूकाही यात्रेचे स्वरूप आले होते.
दर्शनासाठी मुबंई, ठाणे पुणे आदी शहरांतील आणि परराज्यातून भाविक व पर्यटक मोठ्या प्रमाणावर पालीत दाखल झाले होते. भाविकांची गर्दी असल्याने येथील दुकानदार व हॉटेल व्यवसायिकांचा धंदा देखील तेजीत होता. मंदिर परिसरात गावठी भाज्या, फळे, कंदमुळे व रानमेवा घेऊन अनेक महिला विक्रेत्या बसल्या होत्या. देवळात येणारे भाविक आवर्जून ते खरेदी करत होते. त्यामुळे या विक्रेत्यांचा धंदा चांगला झाला.
वाहतूक कोंडी
भाविकांची वाहने व अवजड वाहने यांची मोठ्या प्रमाणात रेलचेल होती. त्यामुळे अरुंद रस्त्यावरून समोरसमोरून वाहने आल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली नाक्या नाक्यावर पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. तसेच देवस्थानचे सुरक्षा रक्षक देखील देवस्थान परिसरातील वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत होते.
सलग सुट्ट्या आल्यामुळे मोठ्या प्रमाणात भाविक पालीत बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी आले होते. अनेकांनी चांगली खरेदी देखील केली. त्यामुळे व्यवसाय चांगला झाला.
-राहुल मराठे, व्यावसाईक, बल्लाळेश्वर मंदिर
देवस्थान ट्रस्टने भाविकांसाठी विशेष खबरदारी घेत उपाययोजना केल्या आहेत. देवस्थानचे दोन भक्त निवास नाममात्र दरात भाविकांसाठी उपलब्ध केले आहेत. बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने भाविकांच्या सोयीसाठी शुद्ध थंड पाण्याची व सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली आहे. रांगेत उभे राहण्यासाठी रेलींग व शेड उभारण्यात आली आहे. वाहने पार्क करण्यासाठी देवस्थानची दोन भव्य मोफत पार्किंग देखील आहे. तसेच सुसज्ज स्वच्छता गृह देखिल उभारण्यात आले आहेत. प्रसादालयात नाममात्र शुल्कात भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे दर्शनासाठी येणार्या भाविकांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होत नाही. – जितेंद्र गद्रे, अध्यक्ष, बल्लाळेश्वर देवस्थानदेवस्थान ट्रस्टने भाविकांसाठी विशेष खबरदारी घेत उपाययोजना केल्या आहेत. देवस्थानचे दोन भक्त निवास नाममात्र दरात भाविकांसाठी उपलब्ध केले आहेत. बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने भाविकांच्या सोयीसाठी शुद्ध थंड पाण्याची व सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली आहे. रांगेत उभे राहण्यासाठी रेलींग व शेड उभारण्यात आली आहे. वाहने पार्क करण्यासाठी देवस्थानची दोन भव्य मोफत पार्किंग देखील आहे. तसेच सुसज्ज स्वच्छता गृह देखिल उभारण्यात आले आहेत. प्रसादालयात नाममात्र शुल्कात भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे दर्शनासाठी येणार्या भाविकांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होत नाही.
– जितेंद्र गद्रे, अध्यक्ष, बल्लाळेश्वर देवस्थान