मुरुडचे जनजीवन विस्कळीत

| कोर्लइ | वार्ताहर |

मान्सूनने मंगळवारी (दि.15) देशाचा निरोप घेतला तरी जाता जाता या पावसाने जनजीवन विस्कळीत करून टाकले आहे. सलग तिसर्‍या दिवशीही पावसाने मुरुडला हजेरी लावली होती. वीजांच्या गडगडाटासह मुरुड मध्ये पाऊस बरसल्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत पडला आहे. तालुक्यातील बोरली मांडला, कोर्लई, बार्शीव, काशीद, सर्वे, नांदगाव, मजगाव आगारदांडा, सावली, उसडी, नांदले, टोकेखार, तेलवडे, खारआंबोली या परिसरातील परतीच्या पावसाचा जनजीवनावर परिणाम दिसून येत आहे.

Exit mobile version