मुरुडचा रस्ता खड्ड्यात

सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष

| कोर्लई | वार्ताहर |

मुरुडच्या परेश नाका ते मारुती नाका रस्त्यावर तहसीलदार कार्यालयासमोर रस्त्यावर गेल्या अनेक दिवसांपासून खड्डे पडले आहेत. याकडे संबंधित सार्वजनिक बांधकाम खात्याच्या दुर्लक्षाबाबत नाराजी व्यक्त होत असून, खड्डे बुजविण्याची मागणी केली जात आहे.

परेश नाका ते मारुती नाका मुख्य रस्त्यावर तहसीलदार कार्यालय, वनविभाग, सेतू, न्यायालय, पोस्ट आदी महत्त्वाची कार्यालये असून, या ठिकाणी विविध कामांसाठी तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. या रस्त्यावर गेल्या अनेक दिवसांपासून खड्डे पडले असून, वेळप्रसंगी अपघाताची शक्यता आहेत. तरी, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी यात लक्ष पुरवून पावसाळ्यापूर्वी येथील खड्डे बुजविण्याची मागणी जोर धरत आहे.

Exit mobile version