मुरूडच्या पत्रकाराचे काम अग्रस्थानी – मुख्याधिकारी पंकज भुसे

। आगरदांडा । प्रतिनिधी ।
समाजात घडणार्‍या सकारात्मक घटनांवर आधारित बातमी लिहून त्यांना न्याय देण्याचे काम येथील पत्रकार अग्रस्थानी आहेत, असे मत प्रशासक तथा मुख्याधिकारी पंकज भुसे नगरपरिषद मधील कै.नानासाहेब धर्माधिकारी सभागृहात आयोजित पत्रकारांच्या सत्कार समारंभावेळी बोलत होते. यावेळी प्राचार्य डॉ.विश्‍वास चव्हाण, नरेंद्र नांदगावकर, प्रशांत दिवेकर, नंदकुमार आंबेतकर, संजय वेटोळी, लेखापाल कपिल वेहेले, मनोज पुलेकर, साहिल मुजावर, सतेज निमकर, सुदेश माळी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. यावेळी पत्रकार सिराज शेख, सुधीर नाझरे, नितिन शेंडगे, गणेश चोडणेकर, प्रकाश सद्रे, संजय करडे यांना प्रशासक तथा मुख्याधिकारी पंकज भुसे व प्राचार्य डॉ.विश्‍वास चव्हाण यांच्या हस्ते गुलाब पुष्प, प्रशस्तिपत्र व चांदीची छोटी मुर्ती भेट देऊन सन्मानित करण्यात आले.

Exit mobile version