मुसर्रत कादिरी सेवानिवृत्त

| कोर्लई | वार्ताहर |

मुरुड तालुक्यातील राजपुरी गावच्या उर्दू शिक्षका मुसर्रत सैय्यद अहमद कादिरी या आपल्या 29 वर्षांच्या उत्तम प्रकारे सेवेनंतर गुरुवारी (दि.29) फेब्रुवारी रोजी निवृत्त झाल्याबद्दल त्यांच्याकरीता सेवापूर्ती सदिच्छा कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.

रायगड जिल्हा परिषदेच्या मुरुड, श्रीवर्धन, पनवेल, खालापूर आदी तालुक्यातील उर्दू शाळांतून त्यांनी आपली सेवा बजावली होती. पनवेल तालुक्यातील तळोजा येथील शाळेत त्यांना निरोप देण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका शबाना मॅडम होत्या. माजी मुख्याध्यापक तथा प्रख्यात उर्दू शायर सैफुल्ला फिरफीरे जनाब यांनी यावेळी त्यांच्यावर आधारित स्वतः रचलेल्या उर्दू काव्यातून त्यांचा गौरव करुन त्याची प्रशस्ती पत्राद्वारे फ्रेम करून यावेळी त्यांना भेट दिली. कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते.

Exit mobile version