नागाव येथे संगित मैफिल

। रेवदंडा । वार्ताहर ।
दिपावलीच्या लक्ष्मी पुजनाचे औचित्याने नागाव येथील श्री वंखनाथ मंदिराचे सभागृहात दिवाळी पहाट संगित मैफिल संपन्न झाली. या संगित मैफिलमध्ये गायक निलेश जंगम, थळ येथील चंद्रकांत नवगावकर, गोंधळपाडा येथील महेश पाटील, आग्राव येथील संजय डबे यांनी सहभाग घेतला तर नागावचे मृदंगमणी महेश ठाकूर, तबला वादनकार सुभाष नाईक यांनी त्यांना साथ दिली. या संगित मैफिल कार्यक्रमास नागाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नंदु मयेकर, ग्रा.प.सरपंच निखिल मयेकर, हर्षदा मयेकर, आदेश मोरे, राजु मयेकर, मंदार वर्तक आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version