। रेवदंडा । वार्ताहर ।
नागाव ग्रामपंचायतीचे नागाव आरोग्य उपक्रेद्रांचे सहकार्याने मिशन कवच कुंडल अंतर्गत घरोघरी लसीकरण मोहिम दि. 14 ऑक्टोबर रोजी राबविण्यात आले.
नागाव ग्रामपंचायत सरपंच निखिल मयेकर यांनी नागाव ग्रामपंचायतीत संपुर्ण कोरोना मुक्त ग्रामपंचायत करण्याचा निर्धार केला असून जास्तीत जास्त लसीकरणावर भर देण्यात येत आहे. नागाव ग्रामपंचायतीच्या मार्फत मोफत लसीकरण राबविण्यात आली होती त्यावेळी मोठया संख्येने नागाव ग्रामस्थांनी प्रतिसाद दिला. नागाव मध्ये सर्वानाच लसीकरण लाभावे यासाठी नागाव आरोग्य उपकेंद्राचे सहकार्याने मिशन कवच कुंडल अंतर्गत घरोघरी लसीकरण मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमे अंतर्गत दि. 14 ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ ते सायकांळी पाच वाजेपर्यंत लसीकरण मोहिम राबविण्यात आली. यामध्ये एकूण शंभर जणांना लसीकरणाचा लाभ घेतला, यामध्ये बहुसंख्य वयोवृध्द मंडळी लाभार्थी होती.
या मोहिमे अंतर्गत सरपंच निखिल मयेकर, ग्रा.प.सदस्या हर्षदा मयेकर व नागाव आरोग्य उपकेंद्राचे कर्मचारी, रूग्णसेविका, आशा वर्कस् आदीने सहभाग धेतला, यावेळी घरोघरी जाऊन सरपंच निखिल मयेकर यांनी सुरक्षीत नागाव साठी लसीकरणाचे आवाहन केले.