मुठवली खु. येथील रत्नाई भवानीमाता

। खांब-रोहा । वार्ताहर ।
रोहा तालुक्यातील धार्मिक व आध्यात्मिक क्षेत्रात नावाजलेल्या मुठवली खु. येथील शिवकालीन स्वयंभू देवी रत्नाई भवानीमाता भक्तांच्या हाकेला धावणारी व नवसाला पावणारी जागृत देवस्थान म्हणून तिची ख्याती सर्वदूर पसरलेली आहे. नवरात्रीचे नऊ दिवसांत या रत्नाई भवानी मातेच्या मंदिरात मोठा उत्सव साजरा केला जातो. या उत्सव काळात रोहा तालुक्यासह रायगड जिल्हा तसेच मुंबई, ठाणे व पुणे येथून मोठ्या संख्येने देवीचे भक्त आपले नवस बोलण्यासाठी व फेडण्यासाठी येतात.

हे मंदिर गाभार्‍यासह सभागृही प्रशस्त व भव्यदिव्य स्वरूपात आहे. मंदिरात रत्नाई देवी मध्यभागी असून, तिच्या उजव्या बाजूला वाघजाई, सोमजाई तर डाव्या बाजूला गणपती, विठ्ठल, शिवपिंडी व शिवपिंडी समोर नंदी, चांदसूर्य कळा लावण्याचा उताळा अशी दैवतं वसली आहेत. मंदिरात दर मंगळवार व शुक्रवार रोजी शिवगर्जना मित्र मंडळ व ग्रामस्थांकडून महाआरती केली जाते. येथे कळा लावण्यासाठी रविवार, मंगळवार, गुरूवार व शुक्रवार रोजी भाविक भक्तांची मोठी गर्दी होत असल्याचे मंदिराचे पुजारी सुदाम मारूती शिंदे यांनी सांगितले.

Exit mobile version