| गाव-कोलाड | वार्ताहर |
रोहा तालुक्यातील गावदेवी क्रीडा मंडळ नडवली आयोजित क्रिकेट सामन्यात अखेर अटीतटीच्या लढतीत गावदेवी नडवली संघ अंतिम विजेता ठरला. स्पर्धेतील अंतिम सामन्यात नडवली संघाने धाक्सूद चिल्हे संघावर मात केली. स्पर्धेतील तृतीय क्रमांक मानकरी यंगस्टार देवकान्हे संघ ठरला. या स्पर्धेत उत्कृष्ट सामनावीर नडवली संघाचा नितीन भोसले, उकृष्ट गोलंदाज देवकान्हे संघाचा स्वप्नील भोईर, तर उत्कृष्ट फलंदाज म्हणून गावदेवी नडवली संघाचा संदेश मोहिते यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
खांब विभागीय क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने श्री गावदेवी क्रीडा मंडळ नडवली यांनी आयोजित केलेल्या स्पर्धा नडवलीच्या प्रांगणात पार पडल्या. या स्पर्धेचे उद्घाटन खांब विभागीय कुणबी समाजाचे अध्यक्ष तथा माजी सरपंच रामचंद्र चितलकर, मनोज शिर्के, खांबच्या विद्यमान सरपंच कांचन मोहिते, ओबीसी संघर्ष समन्वय समितीचे खांब विभागीय अध्यक्ष पत्रकार डॉ. श्यामभाऊ लोखंडे, नडवली गावचे अध्यक्ष व आदर्श शिक्षक किशोर जाधव, सेवानिवृत्त शिक्षक रमाकांत जाधव, अभिजित भोसले, मारूती मांडलुस्कर यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेला रसिकप्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद लाभला. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी खांब क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजय भोसले यांच्यासह पदाधिकारी व सर्व खेळाडूंनी परिश्रम घेतले.
क्रिकेट स्पर्धेत नडवली संघाची बाजी
